चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. भारताविरुद्ध सेमी फायनलमध्ये पराभूत झाल्यावर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने वनडे आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
स्टीव्ह स्मिथनंतर पुढीलपैकी अजून काही खेळाडू हे चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यावर निवृत्ती घेऊ शकतात.
37 वर्षांच्या रोहित शर्माची चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही शेवटची आयसीसी टूर्नामेंट ठरू शकते. टी 20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यावर कर्णधार रोहित शर्माने टी 20 फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर तो मोठा निर्णय घेऊ शकतो.
36 वर्षांचा विराट कोहली सुद्धा चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर वनडे फॉरमॅटमधून निवृत्त होण्याची शक्यता आहे. वर्ल्ड कप 2024 नंतर विराटने सामना संपल्यावर तो टी 20 मधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले होते.
भारताचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा हा सुद्धा टी 20 नंतर वनडे फॉरमॅटमधून निवृत्ती घेऊ शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही जडेजाची शेवटची आयसीसी टूर्नामेंट ठरू शकते.
न्यूझीलंडचा स्टार खेळाडू केन विल्यमसन हा अजून 34 वर्षांचा असला तरी सेंट्रल कांट्रेक्टमध्ये त्याला स्थान देण्यात आलेलं नाही, तसेच तो सध्या टी 20 फॉरमॅटमध्ये जास्त फोकस करतोय. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर तो वनडेतून निवृत्ती घेऊ शकतो.
अफगाणिस्तानचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद नबीचा सुद्धा हा शेवटचा आयसीसी टूर्नामेंट असू शकतो. मोहम्मद नबी आता 41 वर्षांचा झाला असून तो लवकरच क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमधून निवृत्त होण्याची शक्यता आहे.