भारताचा इतिहास खूप गौरवशाली आहे. इतिहासात अशा अनेक गोष्टी घडल्या ज्या लोकांना माहित नाहीत.
खूप कमी लोकांना माहितीये की भारतात एक असेही राष्ट्रपती झाले ज्यांना एकाचवेळी दोन्ही हातांनी लिहिता यायचं.
सध्या द्रौपदी मुर्मू या भारताच्या वर्तमान राष्ट्रपती आहेत. 2022 पासून त्या या पदावर आहेत.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांच्याकडे एकाच वेळी दोन्ही हातांनी लिहिण्याची कला होती.
एवढंच नाही तर डॉ राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. डॉ राजेंद्र प्रसाद यांनी भारताला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली.
डॉ राजेंद्र प्रसाद यांनी 1952 ते 1960 या कालावधीत आपली सेवा दिली. दोन्ही हातांनी लिहू शकणाऱ्या व्यक्तीला अॅम्बिडेक्सट्रस (Ambidextrous) म्हणतात.
डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा जन्म 3 डिसेंबर 1884 रोजी झाला आणि 28 फेब्रुवारी 1963 रोजी पटना येथे त्यांचे निधन झाले.