2021 पासून आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक यॉर्कर चेंडू टाकण्याचा विक्रम आवेश खानने केला आहे.
आवेशने एकूण 133 यॉर्कर टाकले आहेत. यामध्ये 5 विकेट घेतल्या आहेत.
दुसऱ्या नंबरवर आहे जसप्रीत बुमराह. 2021 पासून आतापर्यंत बुमराहने 121 यॉर्कर टाकले आहे. ज्यामध्ये 11 विकेट त्याने घेतल्या आहेत.
अर्शदीप सिंहचे नाव या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 2021 पासून 106 यॉर्कर टाकले आहेत. ज्यामध्ये 7 विकेट त्याने घेतल्या आहेत.
टी नटराजनने 2021 पासून 93 यॉर्कर टाकले आहेत. ज्यामध्ये 4 विकेट त्याने घेतल्या आहेत.
भुवनेश्वर कुमारचे नाव पाच नंबरला आहे. त्याने 2021 पासून 86 यॉर्कर टाकले आहेत. ज्यामध्ये फक्त 1 विकेट प्राप्त केली आहे.