IPL 2025 Mega Auction आधी 'या' 5 खेळाडूंना CSK करु शकते रिटेन! एकाच बॉलरचा समावेश

चेन्नईची यादी चर्चेत

चेन्नई रिटेन करणाऱ्या संभाव्य खेळाडूंची यादी चर्चेत आहे.

एम. एस. धोनी

220.64 च्या स्ट्राइक रेटने 2024 मध्ये धोनीने 161 धावा केल्या आहेत.

सर्वात अनुभवी खेळाडू

धोनी हा केवळ चेन्नईच्या संघातील नाही तर एकंदरितच आयपीएलमधील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे.

ऋतुराज गायकवाड

आयपीएलमध्ये 14 खेळींमध्ये ऋतुराज गायकवाडने 583 धावा केल्या. कर्णधार म्हणून चमक दाखवली.

रविंद्र जडेजा

2024 च्या आयपीएलमध्ये रविंद्र जडेजाने 367 धावा केल्या आणि 8 विकेट्स घेतल्या.

शिवम दुबे

162.29 च्या सरासरीने आयपीएल 2024 मध्ये 396 धावांचा डोंगर मधल्या फळीतील शिवम दुबेने उभा केला.

मथीशा पथिराना

जखमी झाल्याने आयपीएल 2024 अर्थ्यात सोडलं तरी सहा सामन्यांमध्ये मथीशा पथिराना या श्रीलंकन गोलंदाजाने 13 विकेट्स घेतल्या.

डिरेल मिशेल

डिरेल मिशेलने 142.60 च्या स्ट्राइक रेटने 318 धावा आयपीएल 2024 मध्ये केल्या. मात्र मोजकेच परदेशी खेळाडू रिटेन करता येणार असल्याने डिरेल रिटेन होण्याची शक्यता कमी.

अपेक्षा असूनही 'तो' अपयशी ठरला

गोलंदाजीने दीपक चाहर आयपीएल 2024 मध्ये प्रभाव टाकण्यास अपयशी ठरला.

रिटेन होणं कठीण

आयपीएल 2024 मध्ये 8 सामन्यांमध्ये दीपक चाहरने केवळ 5 विकेट्स घेतल्याने तो रिटेन होणं कठीण दिसत आहे.

पाच वेळा जेतेपद

चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने पाच वेळा आयपीएल चषक जिंकला आहे.

सहाव्यांदा विजय मिळवण्यासाठी...

चेन्नईचा संघ 2025 च्या आयपीएलमध्ये सहाव्यांदा विजय मिळवण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरेल यात शंका नाही.

VIEW ALL

Read Next Story