संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित चित्रपटातील आपल्या या भूमिकेमुळे तृप्ती डिमरीला नॅशनल क्रश ही उपाधी नेटकऱ्यांनी दिली आहे.
मात्र सध्या 'अॅनिमल' चित्रपटामुळे चर्चेत आलेल्या तृप्ती डिमरीचं भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीबरोबर एक खास नातं आहे तुम्हाला ठाऊक आहे का?
तृप्ती डिमरीच्या आधीच्या रिलेशनशीबद्दल बोलायचं झाल्यास कथित माहितीनुसार, ती चित्रपट निर्माता कर्णेश शर्माबरोबर रिलेशनशीपमध्ये होती.
तृप्ती आणि कर्णेश यांनी कधीच आपल्या नात्याबद्दल सार्वजनिकरित्या भाष्य केलं नाही. मात्र त्यांचे फोटो कायमच चर्चेचा विषय ठरले.
कर्णेश हा अभिनेत्री अनुष्का शर्माचा भाऊ आहे. म्हणजेच कर्णेश हा विराटचा मेहुणा आहे.
कर्णेश शर्माची निर्मिती असलेल्या 'कला' आणि 'बुलबुल' या दोन्ही चित्रपटांमध्ये तृप्तीने मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती.
कर्णेश आणि तृप्तीने एकत्र काम केल्याने त्याच्या नात्याला प्रोफेश्नल किनारही होती.
मात्र याच वर्षाच्या सुरुवातीला कर्णेश आणि तृप्तीने एकमेकांना अनफॉलो केलं. तेव्हापासून त्यांच्या नात्यासंदर्भातील गूढ कायम आहे.
केवळ अनफॉलोच नाही तर तृप्तीने सोशल मीडियावर असलेले कर्णेशबरोबरचे सर्व फोटो आणि पोस्ट डिलीट केल्या.
सार्वजनिक जीवनामध्ये आपला कर्णेशशी काही संबंध होता याचे पुरावेच तृप्तीने स्वत: सोशल मीडियावरुन हटवले.
कर्णेश आणि तृप्तीचं ब्रेकअप नेमकं का झालं याची ठोस माहिती उपलब्ध नाही. मात्र मनोरंजन क्षेत्रातील चर्चेनुसार दोघांमध्ये मदतभेद होते.
एकमेकांना वेळ देण्यावरुन कर्णेश आणि तृप्तीमध्ये मतभेद असल्याने त्यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा मनोरंजन सृष्टीत आहे.