हरियाणा निवडणुकीत विनेश फोगटला किती मतं मिळाली?


भारताची माजी कुस्तीपटू विनेश फोगट यंदा प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती.


हरियाणाच्या जींद जिल्ह्यातील जुलाना येथून काँग्रेसने विनेश फोगट हिला विधानसभेसाठी आमदारकीचे तिकीट दिले होते.


8 ऑक्टोबर रोजी हरियाणा राज्याच्या विधानसभेचा निकाल जाहीर झाला असून यात विनेशचा मोठ्या मतांनी विजय झाला आहे.


जुलाना येथून विनेश फोगटचे प्रमुख प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार योगेश कुमार होते.


विनेशने एकूण 6015 मतांची आघाडी घेऊन या निवडणुकीत विजय मिळवला.


विनेश फोगटला पहिल्याच विधानसभा निवडणुकीत 65080 मतं मिळाली. तर तिचे प्रतिस्पर्धी असलेल्या भाजप उमेदवाराला 59065 मतं मिळाली.


WWE ची रेसलर कविता राणी ही सुद्धा विनेश विरुद्ध जुलाना येथून आम आदमी पक्षाकडून निवडणुकीसाठी उभी होती. मात्र तिला केवळ 1280 मतं मिळाली.


विनाश फोगट आता राजकारणातील तिच्या नव्या इनिंगला सुरुवात करणार असून यासाठी कुस्तीपटू बजरंग पुनिया याने तिला शुभेच्छा दिल्या.

VIEW ALL

Read Next Story