विराट कोहली खेळणार 300 वा वनडे सामना; 1 किंवा 2 नाही तर तब्बल 7 महारिकॉर्ड निशाण्यावर

Pooja Pawar
Mar 01,2025


चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलग दोन दिमाखदार विजय मिळवल्यावर टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना भारत न्यूझीलंड विरुद्ध खेळेल.


न्यूझीलंड विरुद्धचा सामना विराट कोहलीचा 300 वा सामना असणार आहे. अशी कामगिरी करणारा विराट 7 वा भारतीय खेळाडू आहे.


विराट त्याच्या 300 व्या सामन्यात सचिन तेंडुलकर, शिखर धवन आणि ख्रिस गेल सहित काही दिग्गज खेळाडूंचे रेकॉर्ड या सामन्यात मोडू शकतो.


चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड शिखर धवनच्या नावे आहे. त्याने स्पर्धेत 10 सामन्यांमध्ये 701 धावा केल्या होत्या. तर विराट कोहलीने 15 सामन्यांमध्ये 651 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध 51 धावा करताच कोहली धवनचा रेकॉर्ड मॉडेल.


ख्रिस गेलच्या विक्रमाबाबत बोलायचे झाल्यास ख्रिस गेल हा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 17 सामन्यात 791 धावा केल्या. न्यूझीलंड विरुद्ध कोहलीने 141 धावा करताच तो ख्रिस गेलचा रेकॉर्ड मॉडेल.


न्यूझीलंड विरुद्ध वनडेत सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. त्याने 42 वनडेत 1750 धावा केल्या. कोहलीने न्यूझीलंड विरुद्ध 31 सामन्यांमध्ये 1645 धावा केल्या आहेत. जर त्याने रविवारी 106 धावा केल्या तर तो सचिनचा विक्रम मोडून शकतो.


न्यूझीलंड विरुद्ध वनडेत सर्वाधिक शतक ठोकण्याचा विक्रम हा वीरेंद्र सेहवागच्या नावे आहे. त्यांनी 23 सामन्यांत 6 शतक ठोकली. यापूर्वी कोहलीने सेहवागच्या या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. आता अजून एक शतक लगावताच तो न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक वनडे शतक ठोकणारा फलंदाज ठरेल.


गांगुली, द्रविड आणि धवन या फलंदाजांच्या नावे प्रत्येकी न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक 6 वेळा अर्धशतक ठोकण्याचा रेकॉर्ड आहे. कोहलीने यापूर्वी या रेकॉर्डचीही बरोबरी केली असून न्यूझीलंड विरुद्ध पुन्हा अर्धशतकीय खेळी करताच तो हा रेकॉर्ड मोडेल.


विराटने वनडेत आतापर्यंत 158 कॅच घेतले आहेत. जर त्याने पुढील सामन्यात 3 कॅच घेतले तर तो ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज रिकी पॉन्टिंगच्या वनडेत सर्वाधिक 160 कॅच घेण्याचा रेकॉर्डची बरोबरी करू शकतो.

VIEW ALL

Read Next Story