विराट कोहलीने ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 101 धावा केल्या, या निमित्ताने विराटने स्वतःचा 35 वा वाढदिवस अतिशय योग्य पद्धतीने साजरा केला.

कोहलीच्या शतकात 10 चौकारांचा समावेश होता आणि याचं बरोबर 49 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतकांच्या बरोबरीने भारताच्या महान सचिन तेंडुलकरच्या बरोबरी साधली आहे. विराटने स्पर्धेत आपल्या 500 धावा पूर्ण करून आपला शानदार फॉर्म चालू ठेवला.

विराट कोहलीचे 49 वे विश्वचषक शतक अनेक इंटरनेट प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीम करत होते. जवळपास 4 कोटी 40 लाख लोकांनी पाहिले आहे. आणि हे सर्वाधिक जास्त व्हिव असलं देखील होतं.

तर याबाबत रेल्वेमंत्र्यांनी आपले मत व्यक्त केले की, क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना रंगला होता.

इंटरनेटद्वारे प्रेक्षकांच्या या वाढत्या संख्येवर रेल्वेमंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही एक उत्तम उपलब्धी आहे असं म्हंटलं.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी LinkedIn वर लिहिले की इंटरनेट आणि स्वस्त डेटा किमतींनी भारताचे डिजिटल दृश्य बदलले आहे.

2011 मध्ये भारताने जिंकलेला क्रिकेट विश्वचषक आम्हाला आठवतो, त्यावेळी लोक टीव्हीवर सर्वाधिक सामने बघायचे पण आता पाहण्याची वागणूक पूर्णपणे बदलली आहे. लोक मोबाईलवर ऑनलाईन क्रिकेट बघत आहेत. डिजिटल इंडियाच्या यशाचे हे स्पष्ट लक्षण आहे.

VIEW ALL

Read Next Story