भारताने इतिहास रचला

1983 च्या विश्वचषकात भारताने इतिहास रचला. कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने दोन वेळच्या चॅम्पियन वेस्ट इंडिजचा पराभव करत विश्व चषकावर नाव कोरलं. भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे खेळाडू आता काय करतात.

कपिल देव

कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने हा संस्मरणीय विजय संपादन केला. कपिल देवने अंतिम सामन्यात 15 धावा आणि एक विकेट घेतली. विव्ह रिचर्ड्सचा अप्रतिम कॅचचा यात समावेश होता .सध्या कपिल देव हे टीव्ही चॅनेल्सवर क्रिकेट तज्ज्ञ म्हणून दिसतात.

सुनील गावस्कर

1983 च्या विश्वचषकात गावस्कर यांनी सहा सामन्यांत 9.83 च्या सरासरीने फक्त 59 धावा केल्या होत्या. त्यांची सर्वोच्च धावसंख्या 25 होती. सुनील गावस्कर सध्या समालोचक म्हणून सक्रिय आहेत

के. श्रीकांत

अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज होते कृष्माचारी श्रीकांत. श्रीकांत यांनी भारतीय निवड समितीचे प्रमुख म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. सध्या ते क्रिकेट तज्ज्ञांच्या भूमिकेत दिसतात.

मोहिंदर अमरनाथ

अंतिम सामन्यात शेवटची विकेटघेत मोहिंदर अमरनाथ यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं होतं. या सामन्यात ते सामनावीर ठरले होते. मोहिंदर अमरनाथही क्रिकेट तज्ज्ञ म्हणून दिसतात.

यशपाल शर्मा

त्या संघातील एक प्रमुख खेळाडू यशपाल शर्मा आता या जगात नाहीत. 13 जुलै 2021 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाले. 1983 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्यांनी 11 धावा केल्या होत्या.

संदिप पाटील

अंतिम सामन्यात संदीप पाटील यांनी 27 धावा केल्या. संदीप पाटील टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते राहिले आहेत. संदीप पाटील हे क्वचितच टीव्हीवर तज्ज्ञ म्हणून कार्यक्रमात सहभागी होतात.

कीर्ती आजाद

अंतिम सामन्यात कीर्ती आझाद यांना मोठी कामगिरी करता आली नाही. पण स्पर्धेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कीर्ती राजकारणात सक्रिय आहे आणि सध्या अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस पक्षात आहेत.

रॉजर बिन्नी

रॉजर बिन्नी यांनी 1983 विश्वचषकात सर्वाधिक 18 विकेट्स घेतल्या होत्या. रॉजर बिन्नी यांनी अंतिम सामन्यातही एक विकेट घेतली. रॉजर बिन्नी सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत

मदनलाल

मदन लाल यांनी अप्रतिम गोलंदाजी करत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तीन विकेट घेतल्या. मदन लाल सध्या टीव्ही चॅनलवर क्रिकेट तज्ज्ञ म्हणून दिसत आहेत.

बलविंदर संधू

अंतिम सामन्यात बलविंदर संधूने 2 बळी घेतले आणि मदन लाल आणि रॉजर बिन्नी यांना चांगली साथ दिली. बलविंदर मीडियापासून दूर राहणे पसंत करतात.

सय्यद किरमानी

भारतीय संघाचे विकेटकिपर सय्यद किरमानी यांनी अंतिम सामन्यात 14 धावा केल्या होत्या. किरमानी जास्त लाइमलाइटमध्ये राहात नाहीत

VIEW ALL

Read Next Story