भारताचा ऑल राउंडर क्रिकेटर नितीश कुमार रेड्डी याने मेलबर्न टेस्टमध्ये अतिशय कठीण प्रसंगी भारतासाठी दमदार शतक ठोकलं.
दिग्गज फलंदाज स्वस्तात बाद होत असताना नितीशने 172 बॉलमध्ये 104 धावा करून शतक झळकावलं. यानंतर त्याने बाहुबली स्टाईल सेलिब्रेशन करून सर्वांना थक्क केलं.
एवढंच नाही तर तिसऱ्याच दिवशी जेव्हा 83 बॉलमध्ये 51 धावा करत नितीशने अर्धशतक ठोकलं तेव्हा त्याने पुष्पा चित्रपटातील 'मै झुकेगा नही साला' अशी पोझ देऊन सेलिब्रेशन केलं.
नितीश कुमार रेड्डीची ही डेब्यू टेस्ट सीरिज असून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात त्याने भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
नितीश कुमार रेड्डी याचा जन्म विशाखापट्टण येथे 26 मे 2003 रोजी झाला असून त्याच्या वडिलांनी मुलाच्या करिअरसाठी सरकारी नोकरीची 25 वर्ष सर्व्हिस शिल्लक असताना व्हीआरएस घेतली.
नितीश कुमार रेड्डीने भारताकडून 3 टी 20 सामने खेळले असून यात 90 धावा केल्या आहेत. तर 4 टेस्टमध्ये त्याने 284 धावा केल्या आहेत. यात टी 20 मध्ये 1 अर्धशतक आणि टेस्टमध्ये एका शतकाचा समावेश आहे.
नितीश रेड्डी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आंध्रप्रदेशच्या संघाकडून खेळतो तर 2023 पासून तो आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाचा भाग आहे.
2024 च्या सीजनमध्ये त्याने सनरायझर्स हैदराबादसाठी 2 अर्धशतकांसह 303 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 143 च्या जवळपास होता आणि गोलंदाजी करताना 3 विकेट्स ही घेतले होते.