टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात 20 जून पासून होणार आहे. ज्यामध्ये दोन्ही संघांत 5 टेस्ट मॅच खेळल्या जातील. या भारत - इंग्लंड सीरीजमध्ये भारतीय संघाची कमान शुभमन गिलच्या हाती असणार आहे.
शुभमन गिल हा पहिल्यांदाच भारतीय टेस्ट संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यावेळी सगळ्यांच्या नजरा त्याच्या कर्णधारपदावर असतील, कारण या देशात टेस्ट सामने जिंकणे हे भारतीय कर्णधारांसाठी एक मोठे आव्हान राहिले आहे.
इंग्लंडमध्ये सर्वात जास्त टेस्ट सामने जिंकणारा कर्णधार हा विराट कोहली आहे. विराट कर्णधार असताना टीम इंडियाने इंग्लंडमध्ये 3 टेस्ट सामने जिंकले आहेत.
2018 च्या इंग्लंड दौऱ्यामध्ये विराट कोहलीने कर्णधार म्हणून पहिला टेस्ट सामना जिंकला, त्यानंतर 2022 च्या दौऱ्यात त्याने टीम इंडियाला 2 सामने जिंकवून दिले.
या लीस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडमध्ये 2 टेस्ट सामने जिंकले होते.
भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार एम एस धोनी याची इंग्लंडमधील कामगिरी फारशी चांगली नव्हती. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडमध्ये केवळ एकच सामना जिंकू शकला.
यांच्या व्यतिरिक्त सौरभ गांगुली, अजित वाडेकर आणि राहूल द्रविड देखील कर्णधारांच्या यादीत समाविष्ट आहेत. या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडमध्ये 1-1 टेस्टसामना जिंकला होता.