राहुल द्रविडनंतर कोण बनणार राजस्थान रॉयल्सचा कोच?

Published by: Pooja Pawar | Aug 31, 2025

भारताचा माजी कर्णधार आणि कोच असलेल्या राहुल द्रविडने दोन दिवसांपूर्वी अचानकपणे राजस्थान रॉयल्सच्या कोच पदाचा राजीनामा दिला. आयपीएल 2026 पूर्वी राहुलने राजस्थानची साथ सोडली.

Published by: Pooja Pawar | Aug 31, 2025

राहुल द्रविड आणि राजस्थान रॉयल्समधील संबंध खूप जुने होते. द्रविड आयपीएलमध्ये खेळत असताना तो या संघाचा कर्णधार सुद्धा होता.

Published by: Pooja Pawar | Aug 31, 2025

राहुल द्रविडनंतर आयपीएल 2026 साठी राजस्थान रॉयल्सचा कोच कोण बनणार याविषयी उत्सुकतता निर्माण झालीये.

Published by: Pooja Pawar | Aug 31, 2025

कुमार संगकारा :

कुमार संगकारा हा सध्या राजस्थान रॉयल्सचा डिरेक्टर आहे. राहुलनंतर याच्यावर हेड कोच पदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते 2022 मध्ये संगकारा कोच असताना राजस्थान फायनलला पोहोचली होती.

Published by: Pooja Pawar | Aug 31, 2025

चंद्रकांत पंडित :

चंद्रकांत पंडित यांचा कोच म्हणून रेकॉर्ड खूप चांगला आहे. त्यांनी 2022 मध्ये मध्य प्रदेशला पहिले रणजी ट्रॉफी जेतेपद मिळवून दिले आणि 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला सुद्धा आयपीएलचे विजेतेपद जिंकून देण्यात त्यांची भूमिका होती.

Published by: Pooja Pawar | Aug 31, 2025

गॅरी कर्स्टन :

गॅरी कर्स्टन कोच असताना 2011 मध्ये भारताने त्यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ल्ड कप जिंकला होता. गॅरी कर्स्टन काही हंगामांसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक होते.

Published by: Pooja Pawar | Aug 31, 2025

VIEW ALL

Read Next Story