भारतीय महिला चॅम्पियन संघाची उपकर्णधार आणि स्टार फलंदाज स्मृती मंधाना लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
बॉलिवूडमधील म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल सोबत विवाह करणार आहे. मागील जवळपास 5 वर्षांपासून स्मृती आणि पलाश एकमेकांना डेट करतायत.
स्मृती आणि पलाशचा लग्नसोहळा 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
स्मृती मानधनाने तिच्या लग्नाची पहिली पत्रिका राजस्थानातील डिडवाना येथील सुरल्या माता मंदिरात पाठवल्याची बातमी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे पूर्वज डिडवाना येथील होते.
दोन्ही कुटुंब व्यवसायाच्या निमित्ताने अनेक वर्षांपूर्वी डिडवाना सोडून वेगवेगळ्या राज्यात स्थायिक झाले होते.
स्मृती आणि पलाशच्या लग्न सोहळ्याला भारतीय क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत.