कारण ऐकून व्हाल भावूक!
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात वर्ल्ड कपचा 9 वा सामना खेळवला जात आहे. दिल्लीच्या अरुण जेठली मैदानात दोन्ही संघ आमने सामने आले आहेत.
अफगाणिस्तान संघ दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरला. त्यावेळी सर्वांना आश्चर्य वाटलं. त्याचं नेमकं कारण काय? पाहुया...
अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांना आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी भारताविरुद्धच्या सामन्यादरम्यान काळ्या पट्ट्या बांधल्या आहेत.
पश्चिम अफगाणिस्तानला शनिवारी ६.३ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाने हादरवून सोडलं होतं. या भूकंपात आत्तापर्यंत 4 हजार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.
भूकंपात मोठी जीवितहानी झाली असून सुमारे 2 हजार घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यानंतर आज सकाळी पुन्हा अफगाणिस्तानला भूकंपाचे हादरे बसले आहेत.
अफगाणिस्तानला बुधवारी सकाळी 6 वाजून 11 मिनिटांनी अफगाणिस्तानला 6.1 रिश्टर स्केलचा धक्का बसला आहे. त्यामुळे अफगाणी खेळाडूंनी काळी पट्टी बांधण्याचा निर्णय घेतलाय.