रोहित शर्मा का घालतो 45 नंबरची जर्सी?

Pooja Pawar
Apr 29,2025


रोहित शर्मा 30 एप्रिल रोजी त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करणार आहे.


भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या वनडे आणि टी 20 संघाचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माने वनडेत 273, टेस्टमध्ये 67 तर टी 20 मध्ये एकूण 159 सामने खेळले आहेत.


रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत टी 20 वर्ल्ड कप 2024 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अशा दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत.


आयपीएल असो किंवा टीम इंडियाचे सामने रोहित शर्मा हा नेहमी 45 नंबर लिहिलेली जर्सी घालूनच मैदानात उतरताना दिसतो.


रोहित शर्माने एका मुलाखतीत तो 45 नंबर असलेली जर्सी का घालतो याच उत्तर दिलंय.


रोहित शर्माने सांगितले की, 'जर्सीवर कोणता नंबर छापायचा यासाठी बऱ्याच नंबरचा विचार मी केला होता. अनेक नंबर माझ्या जवळच्या मंडळींनी मला सुचवले होते.


पण रोहित शर्माने सांगितले की जेव्हा त्याने आपल्या आईला विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या '45 हा क्रमांक तुझ्यासाठी चांगला आहे'. तेव्हा पासून तो रोहित 45 नंबर असलेली जर्सीच घालतो.

VIEW ALL

Read Next Story