'...म्हणून विनेशने निवृत्तीचा निर्णय घेतला', महावीर फोगाट यांचा मोठा खुलासा

विनेश फोगाट

आई, कुस्ती जिंकली, माझा पराभव झाला...माफ करा, तुझे स्वप्न, माझे धैर्य सर्व तुटले, माझ्याकडे यापेक्षा जास्त ताकद नाही. अशी भावूक पोस्ट विनेश फोगाटने लिहिलीय.

निवृत्तीचा निर्णय

50 किलोपेक्षा अधिक काहीग्रॅम वजन वाढल्याने विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली. त्यामुळे नाराज झालेल्या विनेशनं कुस्तीतून निवृत्तीचा निर्णय घेतलाय, अशी चर्चा सुरू आहे.

विनेशचा निर्णय

विनेशच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. विनेशने भावनेच्या आहारी जाऊन असा निर्णय घ्यायला नको हवा होता, असं क्रिडाप्रेमी म्हणतायेत. अशातच महावीर फोगाट यांनी मोठं वक्तव्य केलंय.

सुवर्णपदक निश्चित होतं पण...

यावेळी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक निश्चित झालं पण विनेश अपात्र ठरली. हीच गोष्ट तिला त्रास देत आहे. आणि म्हणूनच तिने असा निर्णय घेतला, असं महावीर फोगाट म्हणाले.

महावीर फोगाट

विनेश परत आली की, ती पुढच्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यास तयार आहे का? हे समजून घेण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू, असं देखील महावीर फोगाट म्हणाले.

VIEW ALL

Read Next Story