निवृत्तीची घोषणा करताना Virat Kohli ने #269 हा क्रमांक का लिहला? कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक

Mansi kshirsagar
May 12,2025


रोहित शर्मापाठोपाठ विराट कोहलीनेदेखील त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.


विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.


इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्यांनी ही घोषणा केली असून 269 signing off असं लिहलं आहे.


अशातच त्याच्या चाहत्यांना 269 म्हणजे काय? असा प्रश्न पडला आहे. जाणून घेऊया त्यामागचा अर्थ


269 हा त्याचा टेस्ट कॅप नंबर आहे. म्हणून रिटारमेंट घेताना विराटने हा नंबर लिहला आहे.


कसोटी क्रिकेटमध्ये, खेळाडूंना 'कॅप नंबर' दिला जातो जो त्यांच्या कसोटी पदार्पणाच्या क्रमाने दिला जातो.


या नंबरचा अर्थ असा की, एखाद्या खेळाडूने कोणत्या क्रमाने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले


विराट कोहली (Virat Kohli) याला 269 वा कॅप नंबर दिला होता


याचा अर्थ तो भारताकडून 269 व्या क्रमांकावर कसोटी क्रिकेट खेळणारा खेळाडू होता.

VIEW ALL

Read Next Story