आयपीएल संघासोबतच आता जगभरातील संघाची एक आंतरराष्ट्रीय पातळीवर लीग खेळवली जाण्याची चर्चा सुरू आहे. बीसीसीआयने यासाठी पुढाकार घेतला आहे.
2009 ते 2014 दरम्यान चॅम्पियन्स लीग टी-20 खेळली गेली होती. यात आयपीएल संघांव्यतिरिक्त इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या टी-20 संघांनी सहभाग घेतला होता.
चॅम्पियन्स लीगमध्ये एकूण सहा हंगाम खेळले गेले होते. यावेळी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांनी प्रत्येकी दोन वेळा विजेतेपद पटकावलंय.
2009 मध्ये न्यू साउथ वेल्स ब्लूजने त्रिनिदाद एंड टोबैगोचा पराभव करून पहिली चॅम्पियन्स लीगची ट्रॉफी उचलली होती.
तर 2010 मध्ये दक्षिण अफ्रीकेत खेळवल्या गेलेल्या लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सने वॉरियर्सचा पराभव करून विजेतेपद पटकावलं होतं.
त्यानंतर पुढच्याच वर्षी ही ट्रॉफी मुंबई इंडियन्सकडे आली. मुंबईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला अन् 2011 ला ट्रॉफी उचलली.
2012 ला दक्षिण अफ्रीकेत खेळवल्या गेलेल्या लीगमध्ये सिडनी सिक्सर्सने लायन्सचा पराभव करून विजेतेपद पटकावलं होतं.
2013 मध्ये मुंबई इंडियन्सने पुन्हा बाजी मारली अन् फायनलमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव केला होता.
चेन्नई सुपर किंग्सने 2014 साली कोलकाता नाइट राइडर्सचा पराभव करून पुन्हा विजेतेपद पटकावलं होतं.