चॅम्पियन ट्रॉफीसाठी इंग्लंड पात्र ठरणार का? पाहा समीकरण!

शेवटच्या स्थानावर

वर्ल्ड कपच्या पाईंट्स टेबलमध्ये इंग्लंड शेवटच्या स्थानावर आहे. खराबच्या फॉर्ममुळे 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्थान मिळू शकणार का? असा प्रश्न विचारला जातोय.

क्वालिफाय

इंग्लंडसाठी चॅम्पियन ट्रॉफीसाठी क्वालिफाय करणं अवघड झालंय. चॅम्पियन ट्रॉफी खेळण्यासाठी वर्ल्ड कपचे पहिले सात संघ पात्र ठरतात.

चॅम्पियन ट्रॉफी

इंग्लंडला जर चॅम्पियन ट्रॉफीसाठी पात्र व्हायचं असेल तर काय करावं लागेल? असा प्रश्न सर्वांना पडलाय.

नेदरलँड आणि पाकिस्तान

इंग्लंडला आगामी दोन्ही सामन्यात म्हणजेच नेदरलँड आणि पाकिस्तानला हारवावं लागेल.

बांगलादेश

त्याचबरोबर श्रीलंका किंवा ऑस्ट्रेलिया यांना बांगलादेशचा पराभव करावा लागेल.

इंग्लंडच्या नाड्या भारताच्या हातात

इंग्लंडच्या नाड्या भारताच्या हातात देखील असेल, भारताने नेदरलँडला हरवलं तरच इंग्लंड सेमीफायनलमध्ये जाईल.

डिफेन्डिंग चॅम्पियन

दरम्यान, तुम्हाला आठवत असेल तर इंग्लंड डिफेन्डिंग चॅम्पियन आहे. मात्र, यंदा त्यांची सुमार कामगिरीमुळे अनेकांना त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाहीये.

VIEW ALL

Read Next Story