'ऑन पब्लिक डिमांड...'; भारत वर्ल्डकप जिंकला तर काय करणार पूनम पांडे?

Published by: Zee Team | Nov 19, 2023

आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्याची सामान्यांपासून सेलिब्रिटिंपर्यंत उत्सुकता आहे.

Published by: Zee Team | Nov 19, 2023

वर्ल्डकप सामन्यापूर्वी भारतीय संघाचें मनोबल वाढवण्यासाठी पूनम पांडेने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने टीम इंडियाची जर्सी घातली आहे.

Published by: Zee Team | Nov 19, 2023

यासोबत तिने ऑन पब्लिक डिमांड ब्लिडींग ब्लू. सरप्राईजची वाट पाहत आहे. जर भारत वर्ल्डकप जिंकला तर काय होईल? यावेळेस काय प्लॅन आहे? एक्साइटमेंट ओव्हरलोडेड, असे आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Published by: Zee Team | Nov 19, 2023

पूनम पांडेने 2011 च्या क्रिकेट वर्ल्डकप दरम्यान भारत जिंकला तर ती सर्वांसमोर स्वतःचे कपडे उतरवेल असे सांगून सर्वत्र प्रसिद्धी मिळवली होती. या वक्तव्यामुळे ती सर्वत्र चर्चेत आली होती.

Published by: Zee Team | Nov 19, 2023

पूनम पांडेने 2011 मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकला तर मी न्यूड होईल, असे सांगितले होते. मात्र तसे काहीच झाले नाही. यावर पूनमने बीसीसीआयकडून यासाठी परवानगी मिळाली नसल्याचे सांगितले होते.

Published by: Zee Team | Nov 19, 2023

जेव्हा पूनमने फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला तेव्हा तिला स्वतःची एक खास ओळख कशी निर्माण करावी हे समजत नव्हते. तेव्हा तिला काही वादग्रस्त विधाने करण्याचा सल्ला दिला होता.

Published by: Zee Team | Nov 19, 2023

VIEW ALL

Read Next Story