'हे' 4 संघ ठरतील Semi-Finalists! इरफानने पाकिस्तानला वगळत केली भविष्यवाणी

Swapnil Ghangale
Sep 26,2023

5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकप

भारतात खेळवल्या जाणाऱ्या एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडदरम्यान पहिला सामना खेळवला जाणार आहे.

अंतिम 4 संघांची चर्चा

वर्ल्डकप स्पर्धेबद्दल वेगवगेळे तर्क लढवले जात असतानाच या स्पर्धेच्या उपांत्यफेरीमध्ये म्हणजेच अंतिम 4 संघांमध्ये कोणकोणत्या टीम असतील याबद्दलची चर्चा सुरु झाली आहे.

भाकित व्यक्त केलं

अशातच भारतीय विश्वविजेत्या संघाचा सदस्य असलेला भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने अंतिम 4 संघांमध्ये कोण असेल याबद्दलचं भाकित व्यक्त केलं आहे.

समालोचक आहे इरफान

सध्या समालोचक म्हणून क्रिकेटशी जोडलेल्या इरफानने या टॉप 4 टीममध्ये भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानला स्थान दिलेलं नाही.

टॉप 4 मध्ये पाकिस्तान नाही

इरफानने पाकिस्तानला स्थान न दिल्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

कोणत्या संघाची घेतली नावं?

इरफानने नेमक्या कोणत्या चार संघांचं नाव घेतलं आहे पाहूयात...

इरफानची पहिली पसंती भारताला

वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीत जाणारा पहिला संभाव्य संघ म्हणून इरफानने भारतीय संघाचं नाव घेतलं आहे.

दुसऱ्या क्रमांकावर असेल हा संघ

दुसऱ्या क्रमांकावर इरफानने दक्षिण आफ्रिकन संघाचं नाव घेतलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दमदार यशानंतर इरफानने या संघाचा दुसऱ्या स्थानी समावेश केलाय.

उपांत्यफेरीतील तिसरा संघ 'हा' असेल

इरफानच्या मते इंग्लंड हा वर्ल्डकपमध्ये उपांत्यफेरीत जाणारा तिसरा संघ ठरेल.

चौथ्या स्थानी घेतलं या संघाचं नाव

तर चौथा आणि अंतिम संघ म्हणून इरफानने ऑस्ट्रेलियन संघाचा उल्लेख केला आहे.

त्याची पोस्ट चर्चेत

इरफानने आपलं हे मत एक्स अकाऊंटवरुन (आधीचं ट्वीटर) मांडलं आहे.

तुम्हाला हा अंदाज बरोबर वाटतोय का?

इरफानने चाहत्यांनाही तुम्हाला काय वाटतं असं विचारलं असून तुम्ही सुद्धा त्याच्या मताशी सहमत आहात का कमेंट करुन नक्की सांगा.

VIEW ALL

Read Next Story