देश 'वर्ल्ड कपमय' असतानाच धोनी काय करतोय पाहिलं का? 'स्पेशल फ्रेण्ड'ही सोबत

Published by: Swapnil Ghangale | Nov 15, 2023

कायमच चर्चेत

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी कायमच चर्चेत असतात.

Published by: Swapnil Ghangale | Nov 15, 2023

मूळगावी पोहोचला

भारतामध्ये वर्ल्ड कप 2023 च्या सेमीफायनलची चर्चा असतानाच दुसरीकडे धोनी त्याच्या मूळगावी म्हणजेच ल्वाली येथे पोहोचला आहे.

Published by: Swapnil Ghangale | Nov 15, 2023

पत्नीही सोबत

धोनीबरोबर त्याची पत्नी साक्षी सिंह धोनीही दिसत आहे.

Published by: Swapnil Ghangale | Nov 15, 2023

सर्वात जवळचा मित्रही सोबत

तसेच धोनीबरोबर या ट्रीपमध्ये त्याचा सर्वात जवळचा मित्रही आहे. धोनीच्या या 'स्पेशल फ्रेण्ड'चं नाव सीमांत लोहानी असं आहे.

Published by: Swapnil Ghangale | Nov 15, 2023

फार जुना मित्र

सीमांत लोहानी हल्ली अनेक ठिकाणी धोनीबरोबर दिसून येतो. सीमांत लोहानी हा धोनीचा फार जुना मित्र आहे.

Published by: Swapnil Ghangale | Nov 15, 2023

कुठे आहे धोनीचं गाव?

धोनीचं ल्वाली गाव हे उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील जैत तहसीलमध्ये आहे.

Published by: Swapnil Ghangale | Nov 15, 2023

मंदिरातील फोटो

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये धोनी त्याच्या पत्नी आणि मित्रांबरोबर एका मंदिरात उभा असल्याचं दिसत आहे.

Published by: Swapnil Ghangale | Nov 15, 2023

मंगळवारी विमानतळावर

समोर आलेल्या माहितीनुसार धोनी पत्नी साक्षी, मुलगी झिवा आणि काही खास मित्रांबरोबर मंगळवारी सकाळी इंडिगोच्या विमानाने पंतनगर एअरपोर्टवर पोहोचला.

Published by: Swapnil Ghangale | Nov 15, 2023

अर्धा तास विमानतळावरच होता

धोनी आणि त्याचे निकटवर्तीय अर्धा तास विमानतळावर होता. यावेळेस एअरपोर्टवरील अनेक कर्मचाऱ्यांनी त्याच्याबरोबर फोटो काढले.

Published by: Swapnil Ghangale | Nov 15, 2023

साक्षीची मजेदार कॅप्शन

सर्व धोनींमध्ये फार व्यस्त दिवस गेला. माझ्यावर विश्वास ठेवा इथे फार सारे धोनी आहेत, अशा कॅप्शनसहीत साक्षीने एक फोटो शेअर केला आहे.

Published by: Swapnil Ghangale | Nov 15, 2023

VIEW ALL

Read Next Story