आयसीसी वर्ल्डकपमधील 9 व्या सामन्यात आज भारत आणि अफगाणिस्तान भिडत आहेत.
दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडिअममधील सामन्यात अफगाणिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात भारतीय संघाने बदल केले आहेत. या सामन्यात आर अश्विनला विश्रांती देण्यात आली आहे.
मागील सामन्यात ऑस्ट्रेलियाविरोधात जबरदस्त गोलंदाजी करणाऱ्या आर अश्विनच्या जागी शार्दूल ठाकूरला संधी देण्यात आली आहे.
अश्विनने मागील सामन्यात ऑस्ट्रेलियाविरोधात 10 ओव्हर्समध्ये 34 धावा देत एक विकेट घेतली होती.
टॉसनंतर आर अश्विनला संघात जागा दिली नसल्याचं समजताच सुनील गावसकर संतापले. 'मागील सामन्यात त्याने अशी काय चूक केली होती, ज्यामुळे त्याला जागा दिली नाही,' अशी विचारणा त्यांनी केली.
आर अश्विनला संघात जागा न दिल्याने सुनील गावसकर फार नाराज दिसत होते. आर अश्विनला अफगाणिस्तानविरोधातील सामन्यात संधी द्यायला हवी होती असं ते म्हणाले आहेत.
कॉमेंट्री बॉक्समध्ये असणाऱ्या इरफान पठाणनेही मधल्या ओव्हर्ससाठी आर अश्विन संघात हवा होता, हे मान्य केलं आहे.