15 कोटींच्या फार्म हाऊसमधील शामीचा गावरान थाट पाहिला का? इथल्या सोयी पाहून थक्क व्हाल

15 कोटींचं फार्म हाऊस; शमीचा गावरान थाट पाहिला का?

सध्या आयसीसी वर्ल्ड कप 2023 मधील कामगिरीमुळे चर्चेत असलेला भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा एका आलिशान फार्म हाऊसचा मालक आहे.

उत्तर प्रदेशमध्ये आहे फार्म हाऊस

मोहम्मद शमीचं आलिशान फार्म हाऊस त्याच गृहराज्य असलेल्या उत्तर प्रदेशमधील आमरोहा जिल्ह्यातील अलीघर भागात आहे.

श्रीमंतीचं दर्शन घडवणारं

हे फार्म हाऊस गावात असलं तरी अगदीच आलिशान आणि श्रीमंतीचं दर्शन घडवणारं आहे. या फार्म हाऊसमध्ये शमीने जिंकलेले अनेक पुरस्कार पाहायला मिळतात.

भरपूर मोठा हॉल

या फार्म हाऊसमधील हॉल प्रचंड मोठा असून भल्यामोठ्या फार्म हाऊसचा मोकळेपणा अधोरेखित करणारा आहे. हे फार्म हाऊस 150 बिगा म्हणजेच 36 एकरांहून अधिक जागेवर पसरलेलं आहे.

मोठा स्विमिंग पूल

शमीच्या या फार्म हाऊसमध्ये प्रचंड मोठ्या आकाराचा एक स्विमिंग पूलही आहे.

भरपूर मोकळी जागा

शमीच्या या फार्म हाऊसवर निवांत गप्पा मारण्यासाठी बरीच जागा आहे. जागोजागी छप्पर घालून बसण्यासाठी विशेष चौथरे तयार करण्यात आलेत.

अनेक फळांची झाडं

ग्रामीण भागात असलेल्या शमीच्या मालकीच्या या फार्म हाऊसमध्ये अनेक फळांची झाडं आहेत.

आलीशान कार्सचं कलेक्शन

शमीच्या फार्म हाऊसमध्ये आलीशान गाड्यांचं खास केलेक्शनही आहे. या कार्स म्हणजे त्याच्या क्रिकेटमधील यशाची देण आहे.

बाईक्सचं कलेक्शन

केवळ कारच नाही तर बाईक्सचं कलेक्शनही शमीकडे असून ते सुद्धा या फार्म हाऊसवरच आहे.

विशेष पीच

शमीने या फार्म हाऊसमध्ये विशेष पीच तयार करुन घेतलं आहे. सुट्टीवर असतानाही तो अनेकदा इथं सराव करतो.

ओपन गॅरेज

शमीला कार्सची फार आवड असल्याने या फार्म हाऊसमध्ये एक ओपन गॅरेजही आहे.

VIEW ALL

Read Next Story