भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये असून 2023 च्या वर्ल्ड कप फायलनमध्ये त्याच्या कामगिरीकडे चाहत्यांचं विशेष लक्ष असणार आहे.
वर्ल्ड कप 2023 मध्ये विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 10 डावांमध्ये तब्बल 711 धावा केल्या आहेत. त्याने सचिन तेंडुलकरचा एका पर्वातील सर्वाधिक धावांचा विक्रमही मोडला आहे.
वानखेडेवरील न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी-फायनलच्या सामन्यात विराटने सचिनचा एकदिवसीय क्रिकेटमधील 49 शतकांचा विक्रम मोडीत काढला.
विराटने बॅट उंचावून अभिवादन केलं आणि नंतर सचिनकडे पाहून तो नतमस्तक झाला.
विराटची संपूर्ण वर्ल्ड कपभर चर्चा राहिली कारण त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत राहिला.
दरवेळेस शतक झळकावल्यानंतर विराट कोहली जी बॅट उंचावून दाखवतो त्यावर असलेलं एमआरएफचं स्ट्रीकर लावण्यासाठी विराटला दिवसला किती पैसे मिळतात हे जाणून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
2017 साली जून महिन्यामध्ये विराट कोहली आणि एमआरएफ कंपनीमध्ये स्पॉन्सरशीपचा करार झाला. हा करार 8 वर्षांसाठीचा आहे.
म्हणजेच विराटच्या बॅटवर 2025 पर्यंत एमआरएफचाच स्टीकर दिसणार आहे. आता या दोघांमध्ये झालेला करार हा तब्बल 110 कोटींचा आहे.
म्हणजेच दर वर्षी विराट कोहलीला बॅटवर स्ट्रीकर लावण्यासाठी 13 कोटी 75 लाख रुपये मिळतात.
याचाच अर्थ असा की महिन्याला विराटचा केवळ बॅटवर स्ट्रीकर लावण्यासाठी एमआरएफ कंपनी 1 कोटी 14 लाख 58 हजार रुपये देते.
म्हणजेच विराट बॅटवर एमआरएफचं स्ट्रीकर लावण्यासाठी दिवसाला एमआरएफ कंपनीकडून तब्बल 3 लाख 81 हजार रुपये चार्ज करतो.
विराटला बॅटवर स्ट्रीकर लावण्यासाठी दिवसाला मिळणारी रक्कम ही अनेक फ्रेशर्सच्या सुरुवातीच्या वार्षिक पगारापेक्षाही अधिक आहे.