सिक्सर कुणाच्या नावावर? यादी पाहून बसेल धक्का
5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतात वर्ल्डकपचा थरार रंगणार आहे. आतापर्यंत झालेल्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सिक्सर ठोकणाऱ्या खेळांडूंची नावं तुम्हाला माहिती आहे का?
सिक्सरचा किंग युवराज सिंह कुठल्या नंबर आहे पाहून बसेल धक्का. पहिल्या पाच जणांची यादीत कोणत्या कोणत्या खेळाडूचा समावेश ते पाहा.
या यादीत महेंद्र सिंह धोनी पाच क्रमांकावर आहे. धोनीने वर्ल्डकपमध्ये 29 मॅच खेळला आहे. यामध्ये त्याने 780 रन्स ठोकले आहेत. तर 15 सिक्सर त्याच्या नावावर आहे.
चौथ्या क्रमांवर आहे वीरेंद्र सहवान. सेहवाने 22 मॅचमध्ये 18 सिक्सर ठोकले आहेत. तर त्याने वर्ल्डकपमधील सामन्यात त्याने 843 रन्स केले आहेत.
आता भारताचा कॅप्टन आणि हिटमॅन रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने आतापर्यंत दोन वर्ल्डकप स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यात त्याने 17 मॅच खेळून 23 सिक्सर ठोकले आहेत. आता 2023 च्या वर्ल्डकपमध्ये रोहितने 5 सिक्सर ठोकल्यास तो भारतातील सर्वाधिक सिक्सर ठोकणारा फलंदाज ठरेल.
दुसऱ्या क्रमांकावर आहे सौरव गांगुली. त्याने आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये 21 सामन्यात 25 सिक्सर ठोकले आहेत. तर त्याने वर्ल्डकपमध्ये 1006 धावा केल्या आहेत.
गॉर्ड ऑफ क्रिकेट हो सचिन तेंडुलकर या यादीत पहिल्या स्थानावर आहे. 1992 ते 2011 दरम्यान झालेल्या वर्ल्डकपमध्ये त्याने 45 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 27 सिक्सर ठोकले आहेत. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, या पाचमध्ये युवराज सिंहचं नाव येतं नाही.