स्मृतीबरोबर मैदानात दिसलेली स्पेशल व्यक्ती कोण? फोटो Viral झाल्यावर चर्चांना उधाण

Published by: Swapnil Ghangale | Mar 19, 2024

जेतेपदावर नाव कोरलं

स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली बंगळुरुच्या संघाने पहिल्यांदाच महिलांच्या वुमन्स प्रिमिअर लीगमध्ये जेतेपदावर नाव कोरलं

Published by: Swapnil Ghangale | Mar 19, 2024

स्मृतीचा मोठा चाहतावर्ग

भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा मैदानाबरोबरच मैदानाबाहेरही फार मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग आहे.

Published by: Swapnil Ghangale | Mar 19, 2024

फॉलोअर्सची आकडेवारी पाहिल्यावर लोकप्रियता कळते

स्मृतीच्या लोकप्रियतेचा अंदाज तिचे सोशल मीडिया अकाऊंटवरील फॉलोअर्सची आकडेवारी पाहिल्यानंतरच लक्षात येते.

Published by: Swapnil Ghangale | Mar 19, 2024

लूक्सही चर्चेत

स्मृतीच्या फलंदाजीच्या शैलीबरोबरच तिचे लूक्सही सोशल मीडियावर फारच चर्चेत असतात.

Published by: Swapnil Ghangale | Mar 19, 2024

नॅशनल क्रश

स्मृती इतकी सुंदर दिसते की अनेकदा तिचा उल्लेख नॅशनल क्रश म्हणजेच देशभरातील तरुणाईची पसंत म्हणूनही करुन दिली जाते.

Published by: Swapnil Ghangale | Mar 19, 2024

स्मृतीवर कौतुकाचा वर्षाव

वुमन्स प्रिमिअर लीगच्या स्पर्धेमध्ये दिल्लीला पराभूत करुन बंगळुरुला पहिल्यांदाच जेतेपद मिळवून देणाऱ्या स्मृतीचं सध्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Published by: Swapnil Ghangale | Mar 19, 2024

स्मृतीचे फोटो व्हायरल

सोशल मीडियावर वुमन्स प्रिमिअर लीगच्या जेतेपदाची ट्रॉफी उंचावणाऱ्या स्मृतीचे अनेक फोटो सध्या व्हायरल झालेत.

Published by: Swapnil Ghangale | Mar 19, 2024

त्या फोटोनं वेधलं लक्ष

स्मृतीच्या या व्हायरल फोटोंपैकी एकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोत स्मृती एका स्पेशल व्यक्तीसोबत दिसत आहे.

Published by: Swapnil Ghangale | Mar 19, 2024

कोण आहे ही व्यक्ती?

स्मृतीबरोबर जी व्यक्ती दिसत आहे तिचं नाव आहे, पलाश मुछाल! पलाश हा प्रसिद्ध पार्श्वगायिका पलक मुछालचा भाऊ आहे.

Published by: Swapnil Ghangale | Mar 19, 2024

यापूर्वीही एकत्र दिसले दोघे

स्मृतीबरोबर पलाशचा फोटो व्हायरल झाल्याने हे दोघे रिलेशनमध्ये असल्याची चर्चा पुन्हा जोर धरु लागली आहे. विशेष म्हणजे हे दोघे असे पहिल्यांदाच एकत्र दिसले नाहीत.

Published by: Swapnil Ghangale | Mar 19, 2024

अनेकदा एकत्र दिसून आले

यापूर्वीही अनेकदा पलाश आणि स्मृती एकत्र दिसून आले आहेत. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं.

Published by: Swapnil Ghangale | Mar 19, 2024

दोघींच्या माध्यमातून झाली ओळख

पलक मुछाल आणि स्मृती चांगल्या मैत्रीणी आहेत. त्यातूनच या दोघांची ओळख झाल्याचं सांगितलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Mar 19, 2024

पलाश उत्तम संगीतकार

आपली थोरली बहीण पलक मुछालप्रमाणे पलाशही संगीतकार आहे. अगदी गाणी लिहिण्यापासून ते त्याला संगीत देण्यापर्यंतच सर्वच बाबतीत पलाश माहीर आहे.

Published by: Swapnil Ghangale | Mar 19, 2024

नात्यावर जवळपास शिक्कामोर्तब

स्मृती आणि पलाश एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. मात्र आता वुमन्स प्रिमिअर लीगचे जेतेपद साजरे करताना दोघे एकत्र दिसून आल्यानंतर यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे.

Published by: Swapnil Ghangale | Mar 19, 2024

VIEW ALL

Read Next Story