22 मार्च पासून इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनला सुरुवात होणार आहे. दरवर्षी भारतासह विविध देशातील खेळाडू या लीगमध्ये सहभाग घेत असतात.
तेव्हा यंदा आयपीएलमधील सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर खेळाडूविषयी जाणून घेऊयात.
वैभव सूर्यवंशी हा 13 वर्षीय युवक आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू आहे. राजस्थान रॉयल्सने त्याला ऑक्शनमध्ये विकत घेतलं असून तो यंदा राजस्थानकडून आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतो.
गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा भाग असलेला अंगकृष्ण रघुवंशी याच वय 19 वर्षे, 180 दिवस आहे.
पंजाब किंग्स संघातील मुशीर खान हा युवा खेळाडू असून त्याचं वय 19 वर्षे, 239 दिवस आहे. 30 लाख रुपयांना पंजाबने त्याला ऑक्शनमध्ये विकत घेतलं.
लखनऊ सुपर जाएंट्स संघाचा भाग असलेला अर्शीन कुलकर्णी याच वय 19 वर्षे, 332 दिवस आहे. अर्शीन यंदा लखनऊकडून पदार्पण करू शकतो.
एम एस धोनीचं वय सध्या 43 वर्षे, 148 दिवस असून तो यंदा आयपीएलच्या सीजनमधील सर्वात वयस्कर खेळाडू आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू फाफ डू प्लेसिस याचं वय 40 वर्षे, 142 दिवस आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा सत्र खेळाडू मोईन अली हा सुद्धा आयपीएलमधील वयस्कर खेळाडू असून त्याच वय 37 वर्षे, 167 दिवस आहे.