अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय!
पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा सामना खेळवला गेला.
दुसऱ्या सामन्यात तिलक वर्माने दमदार प्रदर्शन करत अर्धशतक ठोकलं. त्याने 41 चेंडूत 51 धावांची खेळी केली.
तिलक वर्माच्या कामगिरीमुळे आता त्याने नवा विक्रम नावावर केला आहे. तिलक वर्माने ऋषभ पंतचा रेकॉर्ड मोडलाय.
टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये अर्धशतक करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू रोहित शर्मा आहे. 20 वर्ष 143 दिवसात रोहितने ही कामगिरी केली.
रोहितनंतर तिलक वर्मा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने 20 वर्ष 271 दिवसात ही कामगिरी करून दाखवली. त्याने ऋषभ पंतचा रेकॉर्ड मोडलाय.
ऋषभ पंतने 21 वर्ष 138 दिवसात पहिलं अर्धशतक ठोकलं होतं. आता तिलक वर्माने त्याचा हा विक्रम मोडीस काढलाय.
ऋषभ पंतनंतर रॉबिन उथप्पाचा या यादीत देखील समावेश आहे. 21 वर्ष 307 दिवसात उथप्पाने ही कामगिरी करून दाखवली.