चेन्नईच्या 'या' खेळाडूला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये खेळवा, युवराज सिंगने स्पष्टच सांगितलं

Published by: Saurabh Talekar | Apr 07, 2024

शिवम दुबे

आयपीएल 2024 मध्ये चेन्नईचा स्टार ऑलराऊंडर शिवम दुबे कहर करतोय. शिवम दुबेने हैदराबादविरूद्धच्या सामन्यात 25 बॉलमध्ये 45 धाव्या केल्या होत्या.

Published by: Saurabh Talekar | Apr 07, 2024

चेन्नई सुपर किंग्स

शिवम दुबेने आयपीएल 2024 च्या 4 मॅचेसमध्ये 49.33 च्या सरासरीने 148 धावा केल्या आहे. चेन्नई सुपर किंग्सचा दुबे या सीझनमध्ये उत्तम कामगिरी करतोय.

Published by: Saurabh Talekar | Apr 07, 2024

ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये

शिवम दुबेने या आयपीएलच्या या सीझनमध्ये धाकड फलंदाजी करत 9 चौके आणि 10 षटकार लावलेत, या प्रदर्शनामुळे दुबे हा ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये देखील दिसतोय.

Published by: Saurabh Talekar | Apr 07, 2024

टी20 वर्ल्ड कप

अशातच युवराज सिंगने शिवम दुबेचं कौतूक देखील केलंय. युवराज सिंगने या वर्षीच्या होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपच्या स्क्वॉडमध्ये शिवम दुबेला सामील करण्याची मागणी केलीये.

Published by: Saurabh Talekar | Apr 07, 2024

युवराज म्हणतो...

शिवम दुबेची दमदार फलंदाजी बघून मला चांगलं वाटलं, असं युवराजने शिवमचं कौतूक करताना आपल्या एक्स अकाऊंटवर लिहिलंय.

Published by: Saurabh Talekar | Apr 07, 2024

गेमचेंजर

युवराजच्या मते शिवम दुबे इंडियन टीमच्या स्क्वॉडमध्ये असायला हवा, त्याच्याकडे गेम चेंज करण्याची क्षमता आहे, असं युवी म्हणतो.

Published by: Saurabh Talekar | Apr 07, 2024

20 ओव्हरमध्ये 165 धावा

सनरायझर्स हैदराबादविरूद्ध झालेल्या 18 व्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सने 20 ओव्हरमध्ये शिवमच्या आक्रमक खेळीमुळे 165 धावा बनवल्या होत्या.

Published by: Saurabh Talekar | Apr 07, 2024

हैदराबाद

याच सामन्यात हैदराबादकडून एडन मारक्रमच्या दमदार अर्धशतकीय खेळीमुळं एसआरएचने हा सामना 18.1 ओव्हरमध्येच जिंकला होता. मात्र, शिवमचं कौतूक मात्र झालं होतं.

Published by: Saurabh Talekar | Apr 07, 2024

VIEW ALL

Read Next Story