युवराज सिंहच्या सावत्र बहिणीची टीम इंडियामध्ये निवड

Aug 16,2025


टीम इंडियाचा माजी विस्फोटक फलंदाज युवराज सिंहने भारताला दोनदा वर्ल्ड कप जिंकवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली होती.


आता युवराज सिंहची बहीण सुद्धा क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करून भारताची मान उंचावणार आहे.


युवराज सिंहची सावत्र बहीण एमी बुंदेल म्हणजेच अमनजोत कौर हिची पॅडल स्पोर्टमध्ये भारतीय संघात निवड झालीये.


जगभरात पॅडल स्पोर्ट हा खेळ प्रसिद्ध असून जे दिसायला टेनिस सारखं असतं. या खेळात आता एमी बुंदेल भारतासाठी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.


मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे होणाऱ्या आशिया पॅसिफिक पॅडल कपसाठी एमीची भारतीय संघात निवड झाली आहे


एमी बुंदेलची ही पहिली मोठी स्पर्धा आहे. एमी आणि युवराज हे सावत्र भावंडे आहेत. एमी बुंदेल ही सोशल मीडियावर सुद्धा फार ऍक्टिव्ह असते.


युवराज सिंहचे वडील योगराज सिंग यांनी त्यांची पहिली पत्नी शबनम हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर नीना बुंदेल उर्फ सतबीर कौरशी लग्न केले होते. त्यांना एक मुलगा व्हिक्टर देखील आहे.

VIEW ALL

Read Next Story