IPL 2025 ची ट्रॉफी यावर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पटकावली आहे. अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सचा पराभव केला.
विराट कोहली आणि त्याचे चाहते तब्बल 18 वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत होते. अखेर या हंगामात आरसीबीने ही प्रतिष्ठेची ट्रॉफी जिंकली आणि चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलं.
विजयानंतर युझवेंद्र चहलची एक्स पत्नी धनश्री वर्माने देखील हा क्षण जल्लोषात साजरा केला.
आरसीबीच्या ऐतिहासिक विजयावर धनश्रीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली.
तिने लिहिलं, 'अखेर, 18 नंबर 18 झाला. विराट कोहली आणि आरसीबीचे हार्दिक अभिनंदन!'
धनश्रीची ही पोस्ट पाहून अनेक नेटकऱ्यांनी ती शेअर केली. एका चाहत्यानेती पोस्ट शेअर करत लिहिलं, 'बघ चहल, जखमेवर मीठ चोळत आहे.'
धनश्री सध्या अभिनयाच्या क्षेत्रात सक्रिय झाली आहे. नुकतंच ती राजकुमार रावसोबत एका गाण्यात झळकली होती आणि सध्या परदेशातही शूटिंगसाठी व्यस्त आहे.
ती पूर्वी युझवेंद्र चहलच्या माध्यमातून आरसीबीशी जोडली गेली होती. त्यामुळे तिची आरसीबीसाठीची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.