टीम इंडियाचा स्टार स्पिनर युझवेंद्र चहल गेल्या काही दिवसांपासून संघातून बाहेर आहे. वनडे वर्ल्ड कपमध्ये चहलला संधी देतील, अशी शक्यता होती.
तेव्हापासून चहलच्या करियरला घरघर लागली. चहलला त्यानंतर कोणत्याही मालिकेत संधी मिळाली नाही. अशातच आता चहलला मोठा धक्का बसलाय.
नुकतंच बीसीसीआयने करार यादी जाहीर केली. यामध्ये ग्रेडनुसार खेळाडूंना करारबद्ध केलं गेलं आहे.
मात्र, टीम इंडियासाठी अनेक सामन्यात संकटमोचक ठरणाऱ्या युझवेंद्र चहल याला बीसीसीआयच्या करारातून वगळण्यात आलं आहे.
युझवेंद्र चहल मागच्या वेळी बीसीसीआयच्या ग्रेड सी कॅटेगरीमध्ये होता. मात्र, आता त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय.
अजिंक्य रहाणे, शिखर धवन, उमेश यादव, युझवेंद्र चहल आणि चेतेश्वर पुजारा या मातब्बर खेळाडूंना बीसीसीआयने रेड सिग्नल दिला आहे.
तर शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल या दोन युवा खेळाडूंना बढती मिळाल्याचं पहायला मिळतंय.