कशासाठी होतो आधार कार्डचा उपयोग?

बँक खाते उघडणे, शाळा महाविद्यालयात प्रवेश घेणे, मालमत्ता खरेदी करणे, ड्रायव्हिंग लायसन्स काढणे, पॅन कार्ड बनवणे, दागिने खरेदी करणे अशा अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्डचा वापर केला जातो.

फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढ

आधारच्या वाढत्या वापरासोबतच त्याच्याशी संबंधित फसवणुकीच्या घटनाही झपाट्याने वाढू लागल्या आहेत. आजकाल अनेक लोकांचे आधार डेटा चोरून त्यांची खाती रिकामी केली जात आहेत.

पोलिसांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना

वाढत्या फसवणूकीच्या घटनांमुळे कोलकाता पोलिसांनी नुकतीच बायोमॅट्रिक आधार कार्ड लॉक करण्याची सूचना दिली होती.

सिम कार्डसह अनेक सुविधा

आजकाल, सिमपासून अनेक प्रकारच्या सर्व्हिस केवळ आधार ऑथेंटिकेशनद्वारे उपलब्ध आहेत. आधार ऑथेंटिकेशनमध्ये युजरचे फिंगरप्रिंट स्कॅन करून काम केले जाते. याचा फायदा आता घोटाळेबाज घेत आहेत.

फिंगरप्रिंटद्वारे AEPSची सुविधा

या ऑथेंटिकेशन Aadhaar Enabled Payment System म्हणजेच AEPS असे म्हणतात. यासाठी कोणत्याही पिनची किंवा ओटीपीची गरज नाही. हे फिंगरप्रिंटद्वारेच केले जाते

गुन्हेगार लुटतायत लाखो रुपये

पोलिसांचे म्हणणे आहे की Aadhaar Enabled Payment System द्वारे लोक त्यांच्या कष्टाचे पैसे बँकेतून गमावत आहेत आणि घोटाळेबाज सहजपणे पैसे काढून घेतात. घोटाळेबाजांना कसा तरी फिंगरप्रिंटचा ठसा मिळतो आणि मग संपूर्ण खेळ होतो.

लॉक करा बायोमेट्रिक आधार

तुम्हाला UIDAI च्या वेबसाइटवर जावे लागेल. येथे तुम्हाला Aadhaar Serviceवर जावे लागेल. येथे तुम्हाला बायोमेट्रिक लॉक/अनलॉकचा पर्याय दिसेल.

पुढचा पर्याय निवडा

यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका आणि तुमच्या फोनवर OTP येईल. यानंतर दुसऱ्या पेजवर बायोमेट्रिक लॉकचा पर्याय दिसेल. तुम्ही येथून लॉक करू शकता. (सर्व फोटो - PTI)

VIEW ALL

Read Next Story