तुमचा आधार क्रमांक खरा आहे की खोटा? एका मिनिटात असं चेक करा

Published by: Swapnil Ghangale | Sep 13, 2025

महत्त्वाचा पुरावा

आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी ओळखीचा महत्त्वाचा पुरावा म्हणून सगळीकडेच आवश्यक असतं.

Published by: Swapnil Ghangale | Sep 13, 2025

आधार कार्ड अनिवार्य

सरकारी योजना, नोकरी, बँका, आर्थिक व्यवहार करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. मात्र आधार कार्डच्या नावाखाली फसवणुकही होऊ शकते. त्यामुळे बनावट आधार कार्डपासून सावध राहिलं पाहिजे.

Published by: Swapnil Ghangale | Sep 13, 2025

व्हेरिफिकेशन करणं गरजेचं

अनेकदा लोक आधार कार्ड खरंच असेल असं मानतात. मात्र आधार कार्डाचं व्हेरिफिकेशन करणं गरजेचं असतं. हे व्हेरिफिकेशन घर बसल्या करता येतं.

Published by: Swapnil Ghangale | Sep 13, 2025

या वेबसाईटला भेट द्या

आधार व्हेरिफिकेशनसाठी यूआयडीआयची अधिकृत वेबसाईट 'युआयडीआय डॉट जी ओव्ही डॉट इन'ला (uidai.gov.in/) भेट द्या.

Published by: Swapnil Ghangale | Sep 13, 2025

'माय आधार' सेक्शन सिलेक्ट करा आणि...

या बेवसाईटवरील 'माय आधार' सेक्शन सिलेक्ट करा. त्यामधील व्हेरिफाय आधार नंबर हा पर्याय निवडा. त्यानंतर आपला आधार कार्ड क्रमांक आणि समोर दाखवलेला अचूक कॅप्चा कोड लिहा.

Published by: Swapnil Ghangale | Sep 13, 2025

...तर तुमचं आधार कार्ड खरं आहे समजावं

त्यानंतर व्हेरिफाय बटणावर क्लिक केल्यावर तुमचा आधार क्रमांक अॅक्टीव्हेट आहे की नाही हे तुम्हाला समजेल. जर तो अॅक्टीव्हेट असला तर तुमचं आधार कार्ड खरं आहे असं समजावं.

Published by: Swapnil Ghangale | Sep 13, 2025

मोबाईल अॅप्लिकेशन

युआयडीएआयने आधार व्हेरिफिकेशनसाठी mAadhaar नावाचं अॅप्लिकेशनही उपलब्ध करुन दिलं आहे. यामध्ये आधार क्रमांक किंवा क्यूआर कोडच्या मदतीने आधार व्हेरिफाय करता येतं.

Published by: Swapnil Ghangale | Sep 13, 2025

क्यूआर कोड स्कॅन

प्रत्येक आधार कार्डवर एक क्यूआर कोड प्रिंट केलेला असतो. mAadhaar वरुन हा क्यूआर कोड स्कॅन करुन लगेच तुम्हाला तुमचं आधार कार्ड खरं आहे की खोटं हे समजू शकतं.

Published by: Swapnil Ghangale | Sep 13, 2025

लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून...

आधार व्हेरिफिकेशन ही सेवा पूर्णपणे मोफत असून आधार कार्डच्या नावाखाली लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून ही सेवा एका क्लिकवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Published by: Swapnil Ghangale | Sep 13, 2025

VIEW ALL

Read Next Story