कोणत्याही कारणानं घरातील एसीची सर्व्हिसिंग टाळल्यास तो खराब होण्याची दाट शक्यता असते.
सर्व्हिस न केल्या कारणानं एसीमध्ये धूळ होऊन त्यामुळं अनेक अडचणी उदभवू शकतात.
एसी उत्तम काम करावा यासाठी महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजे त्यातील फिल्टरची.
एसीचा फिल्टर वेळोवेळी स्वच्छ केला जाणं गरजेचं आहे.
एसी वारंवार बंद- चालू न करता या प्रक्रियांदरम्यान काही काळ जाऊ द्यावा.
या अगदी किरकोळ गोष्टी असल्या तरीही त्यामुळं एसी वर्षानुवर्ष उत्तम कार्यरत राहण्यास मोठी मदत होते हे खरं.