फ्री सर्विस देऊनही Google करतं एवढी कमाई, जाणून घ्या कसं

Aug 05,2024


जगातील लाखो लोक Google वापरतात. हे एक सर्च इंजिन आहे ज्याद्वारे कोणतीही माहिती सहजपणे आपल्याला मिळते. जगभरात Google वापरणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे.


पण तुम्हाला माहित आहे मोफत सुविधा देऊनही गुगल रोज अब्जावधी रूपये कमवतो.


एका रिपोर्टनुसार गुगल एका मिनिटाला 2 कोटी रूपये कमवतो. तुम्ही कधी विचार केला आहे का गुगल इतके पैसे कसे कमावतो.


गुगलचा सर्वात मोठा स्त्रोत हा जाहिराती आहे. ज्यावेळी आपण गुगलवर काही शोधतो त्यावेळी वरच्या दिशेला आपल्याला जाहिराती दिसतात. या जाहिरात कंपन्यांना त्यांच्या जाहिराती दाखवण्यासाठी गुगलला पैसे देतात.


गुगलच्या काही सेवा या मोफत नाहीत. यांचा वापर करण्यासाठी यूजर्सला पैसे द्यावे लागतात. यामार्फंत गुगल भरपूर पैसे कमावतं.


Android हे एक गुगलने तयार केलेले ओपन सोर्स सिस्टम आहे. ज्यामध्ये Google Play Store किंवा गुगल कंपनींची कोणतेही अ‍ॅप वापरल्याने गुगलला पैसे मिळतात.


Google Play Store ही गुगलचीच एक सेवा आहे ज्यामध्ये Android फोनसाठीचे अ‍ॅप्स आणि गेम्स उपलब्ध आहेत.यूजर्स कोणतेही अ‍ॅप्स किंवा गेम्स विनामूल्य डाऊनलोड करू शकतात.गुगल प्ले स्टोअर वापरण्यासाठी कंपन्याना पैसे द्यावे लागतात आणि यामधून गुगलला चांगले उत्पन्न मिळते.

VIEW ALL

Read Next Story