जिओनंतर आता एअरटेलने आपला नवा प्लॅन लाँच केला आहे. पण एअरटेलचा हा प्लॅन न्यू ईअर ऑफर नाही.
कंपनीने 28 दिवसांच्या वैधतेचा प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये तुम्हाला कॉलिंग, डेटा आणि एसएमएसह इतर फायदे मिळतात.
यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड लोकल आणि STD कॉलिंग मिळते. याशिवाय युजर्सला रोज 2GB डेटा आणि 100 एसएमस मिळतात.
एअरटेलचा नवा प्लॅन ओटीटी बेनिफिट्ससह येतो. कंपनी या प्लॅनसह Disney+Hotstar मोबाईलचं 28 दिवसांचं सबस्क्रिप्शन देते.
युजर्सला या प्लॅनमध्ये एअरटेल थँक्स अॅप मिळतं. हे तुम्ही एअरटेल वेबसाईट किंवा दुसऱ्या रिटेल आऊटलेटमधून खरेदी करु शकता. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड 5GB डेटा आणि स्पॅम प्रोटेक्शन मिळतं.