Airtel च्या ऑफरने सर्वांची बोलती बंद; 780 रुपयांची सर्व्हिस फ्री!

Pravin Dabholkar
May 23,2025


एअरटेलने एक खास ऑफर आणलीय. ज्याअंतर्गत 780 रुपयांची सेवा युजर्सना फ्री मिळतेय.


एअरटेलने गुगलसोबत सामंजस्य करार केला असून पोस्टपेड आणि वायफाय यूजर्ससाठी खास ऑफर आहे.


याअंतर्गत 6 महिने 100 जीबी गुगल वन काऊड स्टोरेज फ्रीमध्ये मिळेल.


गुगल वन एक ऑनलाईन स्टोरेज सर्व्हिस आहे. यामध्ये तुमचे फोटो, व्हिडीओ, डॉक्यूमेंट्स आणि फाईल्स सेव्ह करु ठेवू शकता.


फोन, लॅपटॉप खराब झाला तरी तुमचा डेटा सुरक्षित राहतो. कोणत्याही डिवाइसमधून हा डेटा तुम्ही एक्सेस करु शकता.


एअरटेल पोस्टपेड युजर्स आणि एक्स्ट्रीम फायबर (घरचा वायफाय) वर ही ऑफर आहे. प्रीपेड युजर्ससाठी ही ऑफर नाही.


याचा फायदा घेण्यासाठी मोबाईलमध्ये एअरटेल थॅंक्स अॅप डाऊनलोड करुन लॉग इन करा. गुगल वन वर जाऊन ही ऑफर क्लेम करावी लागेल.


गुगल अकाऊंट ओपन केल्यावर तुम्हाला 100 जीबी फ्री स्टोरेज मिळेल. 6 महिन्यानंतर ही ऑफर बंद होईल.125 रुपये मंथली चार्ज देऊन ही ऑफर सुरु ठेवू शकता.


तुम्ही तुमचे गुगल स्टोरेज अकाऊंट 5 जणांसोबत शेअर करु शकता.

VIEW ALL

Read Next Story