महिन्द्राचं सरप्राईज! 7 सीटर फॅमिली कार बाजारात

Jul 25,2024


Mahindra कंपनीने 2018 मध्ये सात सीटर कार Marazzo लॉन्च केली होती. Ertiga आणि Innovaला टक्कर देण्यासाठी ही कार बाजारात आणण्यात आली.


पण गेल्या काही दिवसांपूर्वी कंपनीने या कारचं मॉडल आपल्या अधिकृत वेबसाईटवरुन हटवलं. त्यामुळे ही कार बाजारातून बाद झाल्याची चर्चा रंगली.


पण महिंद्रा कंपनीने सर्वांना सरप्राईज देत पुन्हा एकदा Marazzo कार आपल्या अधिकृत वेबसाईटवर लिस्ट केली आहे. नव्या रुपात ही कार विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलीय.


महिंद्राने Marazzo कारची सेकंड इनिंगमध्ये किंमत वाढवली आहे. आधीपेक्षा ही कार थोडीशी महाग झाली आहे.


Marazzo कार सहा व्हेरिएंटमध्ये बाजारात उतरवण्यात आली आहे. याची एक्स शोरुम प्राईज 14.39 लाख रुपये ठेवण्यात आलीय.


म्हणजे आधीपेक्षा 20 हजार रुपयांनी कार महागली आहे. तसंच टॉप व्हेरिएंटची किंमत 17 लाख रुपये इतकी आहे.


Marazzo कारला नव्या रुपात 1.5 लीटर क्षमतेचं डिझेल इंजिन देण्यात आलंआहे. तर 6 स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे.

VIEW ALL

Read Next Story