रस्त्यानं जात असताना कायमच पिवळी, हिरवी, पांढरी अशा रंगांची नंबर प्लेट असणारी वाहनं नजरेस पडतात. भारतात नंबर प्लेट फक्त वाहनांच्या नोंदणीची माहिती देत नाही, तर ते वाहन खासगी आहे की व्यावसायिक याचीसुद्धा माहिती देते.
पांढरी नंबर प्लेट ही सामान्य नंबर प्लेट असून खासगी वाहनांवर लावली जाते. यामध्ये प्लेटच्या पार्श्वभागावरील रंग पांढरा असून त्यावर काळ्या रंगातील आकडे असतात.
पिवळ्या रंगाची नंबर प्लेट सहसा टॅक्सी, ऑटो, ट्रक अशा व्यावसायिक वापरासाठीच्या वाहनांवर असते.
काळी नंबरप्लेट आणि त्यावर पिवळे आकडे असल्यास या व्यावसायिक नोंदणीच्या गाड्या असतात हे नमूद होतं.
इलेक्ट्रीक वाहनं ही त्यांच्या हिरव्या नंबर प्लेटमुळं ओळखू येतात. तर, पर्मनंट नोंदणीत न आलेल्या वाहनांना लाल रंगाची नंबर प्लेट असते जी सरकारी अधिकारीसुद्धा वापरतात.
निळ्या रंगाच्या नंबर प्लेटचा वापर परराष्ट्र मंत्रालय, राजदूत, सैन्य अधिकारी यांच्या वाहनांसाठी केला जातो.
लष्कराच्या वाहनांवर असणारी नंबर प्लेट काळ्या रंगाची असून त्यावर असणारे आकडे पांढऱ्या रंगात असतात. या नंबर प्लेटवर लष्कराचं चिन्हंही असतं.