कुटुंब वाढत जातं, त्याप्रमाणं कुटुंबासाठी लागणाऱ्या वाहनाच्या गरजासुद्धा खर्च करण्याच्या क्षमतेनुसारच वाढत जातात.
भारतीय ऑटो क्षेत्रात यंदाच्या वर्षी अशाच काही हायब्रिड कारची चर्चा आहे. ज्यामध्ये बजेट कारपासून प्रमियम कारचाही समावेश असू शकतो असं म्हटलं जातंय.
येत्या काळात मारूतीकडून स्विफ्ट, फ्राँक्स या हायब्रिड कार लाँच केल्या जाऊ शकतात. मारुतिची ही कार उत्तम म्हणजेच 30 ते 35 किमी प्रतिलीटर इतकं मायलेज देईल असा दावा कंपनी करत आहे.
ह्युंडई क्रेटाचंही हायब्रिड मॉडेल या वर्षअखेरपर्यंत लाँच होणार आहे. किआ सेल्टोस हायब्रिड कारसुद्धा येत्या काळात लाँच होण्याची शक्यता आहे.
नव्या जनरेशनची रेनॉल्ट डस्टर कारसुद्धा या वर्षी लाँच होऊ शकते.
महिंद्रासुद्धा XUV 3XO Hybrid सह हायब्रिड कार क्षेत्रात नवं पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे.
यंदाच्याच वर्षी टोयोटा अर्बन क्रूजर हायरायडरचं अपडेटेड वर्जनसुद्धा लाँच होण्याची शक्यता आहे.