BMW च्या कार जगभरातील कारप्रेमींच्या अपेक्षा पूर्ण करत अनेकांच्याच पसंतीस उतरतात. अशा या कार कंपनीच्या आद्याक्षरांचं पूर्ण रुप अर्थात फुलफॉर्म तुम्हाला माहितीये?
BMW चं फुलफॉर्म आहे Bayerische Motoren Werke Aktiengesellschaft. बोलताना बोबडी वळली ना?
ही एक जर्मन कंपनी असून, या कंपनीचं इंग्रजी नाव होतं बवेरियन इंजिन वर्क्स कंपनी. इथं ही कंपनी असे इंजिन बनवते जे अनेक कामांसाठी वापरलं जाऊ शकतं असं इथं सुचवणं अपेक्षित होतं.
1913 मध्ये कंपनीनं पहिल्यांदा एअरक्राफ्ट इंजिन तयार केलं होतं.
कंपनीनं फक्त कारच नव्हे, तर बाईकही डिझाईन केल्या. प्रामुख्यानं या कंपनीच्या स्पोर्स्ट्स बाईक अनेकांच्याच आवडीच्या.
कैक वर्षांपासून ही कंपनी विविध प्रकारच्या वाहनांचे इंजिन तयार करत या क्षेत्रात कमालीचं नावलौकिक मिळवण्याचं काम करत आहे.