उन्हाळ्याच्या दिवसात कारला आग लागण्याची किंवा कारचे टायर फाटण्याच्या अनेक घटना घडतात.
पण तुम्हाला माहित आहे का कोणत्या स्पीडवर कार चालवल्याने कारचे टायर फाटू शकतात.
कोणते टायर लावल्यावर कार किती स्पीडवर चालवावी याचे काही नियम आहेत. यासाठी कारच्या टायरवर ठराविक अक्षरं लिहिलेली असतात.
टायरवर K अक्षर लिहिलं असेल तर याचा अर्थ 110 किलोमीटर प्रति तास या वेगाने कार चालवल्यास टायर फाटू शकतं.
यानुसारच टायरवर वेगवेगळी अक्षर लिहिलेली असतात. कार चालकांना सुचित करण्यासाठी ही अक्षरं छापली जातात.
टायरवर P लिहिलं असल्यास याचा अर्थ 150 किलोमीटर प्रति तास या वेगाने कार चालवल्यास टायर फाटू शकतं.
जर तुमच्या टायरवर Z अक्षर लिहिलं आहे. तर याचा अर्थ 240 किमी प्रति तास या किंवा त्याहून अधिक वेगाने कार चालवल्यास टायर फाटू शकतं.