जगात अनेक महागड्या आणि लक्झरी कार आहेत. पण यात रोल्स रॉईस बोट टेल ही जगातील सर्वात महागड्या कारपैकी एक आहे.
रोल्स रॉईस बोट टेल या कारची किंमत 28 मिलिअन अमेरिकन डॉलर म्हणजे भारतीय रुपयात तब्बल 233 कोटी इतकी आहे.
ही फोर सीटर सुपर लक्झरी कन्वर्टेबल कार आहे. ही कार बनवण्यासाठी जवळपास चार वर्ष लागली होती.
विशेष म्हणजे रोल्स रॉईसने या मॉडेलच्या केवळ तीन कारच बनवल्या आहेत. या तीन कार ग्राहकांच्या मागणीनुसार कस्टमाईज करण्यात आल्या आहेत.
या तीन कारपैकी एका कारचा मालक अरबपती रॅपर जे जेड आणि त्याची पत्नी बेयॉन्स हे आहेत.
रोल्स रॉईस बोट टेल या कारचा दुसरा मालक अर्जेंटिनाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू माऊरो इकार्डो आहे
याशिवाय या कारचा तिसरा मालक हा एका डायमंड कंपनीचा मालक असल्याचं सांगितलं जातंय.