या फोनच्या 4GB रॅम वेरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे आणि Flipkart वर 36 टक्के डिस्काउंटसग मिळत आहे. ऑफरमुळे याची किंमच 14,499 इतकी होणार आहे.
यासोबतच यावर अनेक बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत. सॅमसंग अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला 10 टक्के सूट मिळू शकते. कोटक बँक क्रेडिट कार्डवर देखील EMI व्यवहारावर 10 टक्के सूट मिळणार आहे.
तुम्ही जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टला परत केल्यास, तुम्हाला त्याऐवजी 13,000 रुपयांची सूट मिळू शकते. अशी सूट मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या फोनची स्थिती ठीक असावी लागणार आहे.
या फोनमध्ये 6.6 इंच फुल एचडी+ डिस्प्ले मिळत आहे. याशिवाय फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देखील देण्यात आला आहे, ज्याचा बॅक कॅमेरा 50MP आहे. तर यामध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
सॅमसंगच्या फोनमध्ये 5000 mAh बॅटरी असल्यामुळे तुम्हाला अधिक बॅकअप देखील दिला जात आहे. Samsung Galaxy F23 5G मध्ये Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसर मिळत आहे.
या फोनची डिझाइन रचना इतर बजेट स्मार्टफोन्ससारखीच आहे. यामध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आला आहे. जो आपण अनेक फोनमध्ये पाहतो. हा स्मार्टफोन मागून चांगला दिसतो. फोनमध्ये प्लास्टिकची बॉडी आहे
Galaxy F23 5G मध्ये व्हॉईस फोकस फिचर आहे, हे Galaxy F सीरीजमध्ये उपलब्ध असलेले पहिले वैशिष्ट्य आहे. व्हॉईस फोकस वैशिष्ट्य आजूबाजूचा आवाज कमी करून उत्कृष्ट आवाज प्रदान करते जेणेकरून गोंगाटाच्या वातावरणातही तुमचा आवाज नेहमी मोठा आणि स्पष्ट ऐकू येतो.
यामध्ये प्रथमच ऑटो डेटा स्विच फीचर दिले जात आहे, जे तुम्हाला तुमच्या दुसऱ्या सिमवरून कॉल करू आणि रिसीव्ह करण्यास किंवा डेटा वापरण्यास परवानगी देईल. (सर्व फोटो - samsung.com)