एक्सचेंज ऑफरमध्ये आणखी स्वस्तात मिळणार आहे

मिळवा 35 हजारांचा डिस्काउंट

8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या Samsung Galaxy S21 FE 5G या फोनची एमआरपी 74,999 रुपये आहे. पण डीलमध्ये 35,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर हा फोन 39,999 रुपयांना खरेदी करता येईल.

कार्ड पेमेंटवर मिळवा आणखी सूट

सॅमसंग अॅक्सिस बँक कार्डने पेमेंट केल्यावर तुम्हाला 10 टक्के कॅशबॅक देखील मिळणार आहे.

अॅक्सिसच्या कार्डवरही खास सूट

फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या कार्डधारकांना 5 टक्के कॅशबॅक देत आहे.

एक्सचेंज ऑफरही उपलब्ध

तुम्ही हा सॅमसंग फोन 30,000 रुपयांपर्यंतच्या अतिरिक्त एक्सचेंज बोनससह खरेदी करू शकता. पण एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल.

फोनचे फिचर्स काय आहेत?

या सॅमसंग फोनमध्ये, तुम्हाला 2340x1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.4-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले मिळेल. हा डायनॅमिक AMOLED 2x डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

फोनचे स्टोरेज किती?

हा फोन 8 GB रॅम आणि 256 GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. यामध्ये कंपनी ऑक्टा-कोर प्रोसेसर देत आहे, जो खूप पॉवरफुल आहे.

जबरदस्त कॅमेरा

फोनच्या मागील बाजूस फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 8-मेगापिक्सल कॅमेरा आणि 12-मेगापिक्सलच्या दोन कॅमेऱ्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी या फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.

फोनची बॅटरी लाईफ किती आहे?

फोनची बॅटरी 4500mAh ची आहे. ही बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये तुम्हाला 15W वायरलेस चार्जिंग देखील मिळणार आहे. हा सॅमसंग फोन Android 12 वर आधारित OneUI 4 OS वर काम करतो.

कनेक्टिव्हिटीसाठी ऑप्शन काय?

कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac/ax 2.4G+5GHz, Bluetooth 5.0, GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट सारखे पर्याय देण्यात आले आहेत. (सर्व फोटो - samsung.com)

VIEW ALL

Read Next Story