लिस्टमध्ये सगळ्यात पहिलं नाव टाटा अल्ट्रोज रेसर आहे. गाडीत 2 एयर बॅग्सची सोय देण्यात आली आहे. त्याशिवाय त्यात सनरुफ देखील आहे. या गाडीची किंमत 6.99 लाख (एक्स शोरुम) आहे.
हुंडई एक्स्टर SX आणइ SX (o) मध्ये सनरुफ आहे. त्यात सहा एअर बॅग आहेत. या गाडीची 8.23 लाख रुपये (एक्स शोरूम किंमत) आहे.
हुंडई I20 स्पोर्ट ऑप्शनल वेरिएंटमध्ये सनरुफ देण्यात आलं आहे. त्यासोबत 6 एअर बॅग देण्यात आलं आहे. (एक्स शोरुम किंमत ही 8.70 लाख आहे.)
Hyundai Venue च्या E+ व्हेरिएंटमध्ये सनरुफ देण्यात आलं असून या गाडीची एक्स शोरूम किंमत ही 8.23 लाख रुपये आहे.
Tata Nexon च्या XM(s) व्हेरिएंट असलेल्या गाडीत सनरुफचं फिचर आहे. या गाडीची किंमत एक्स शोरूम ही 9.60 लाख रुपये आहे.
तर 10 लाखांच्या आत कोणती गाडी खरेदी करण्याची इच्छा असेल त्यातही सनरुफ हवा असेल तर या गाड्यांना द्या पसंती.