बर्याचदा आपण प्रवासाला निघालो की कारमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त सामान ठेवतो
सुट्ट्या, लग्नसमारंभ, पिकनिक किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासात कारमध्ये ओव्हरलोडिंग करणं ही सामान्य गोष्ट आहे. पण हीच सवय कारच्या मायलेजसाठी परिणामकारण ठरते का?
कार जितकी जड होईल तितकं इंजिनला तिला पुढे नेण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते.
अभ्यासानुसार, कारमध्ये 50 किलो जास्त वजन ठेवल्यास मायलेज 1-2% ने कमी होतो. जर 100-150 किलो अतिरिक्त सामान असेल तर मायलेज 5-10% पर्यंत कमी होऊ शकतो.
मायलेज कमी झाल्यानं मोठ्या प्रवासात पेट्रोल/डिझेलचा खर्च लक्षणीयरीत्या वाढतो.
केवळ मायलेजच नाही तर सुरक्षिततेवरही परिणाम
ओव्हरलोड कारमुळे ब्रेकिंग डिस्टन्स वाढतो म्हणजे अचानक ब्रेक लावल्यास गाडी थांबायला जास्त वेळ लागतो.