WhatsApp वर सुरु आहे Sextortion स्कॅम; अडकायचं नसेल तर आताच सेटिंगमध्ये करा 'हे' बदल

Nov 23,2023

Sextortion हा एक सायबर क्राइम आहे. गेल्या काही दिवसांत यासंबंधी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. एका प्रकरणात तर रेल्वे कर्मचाऱ्याने आत्महत्या केली.

अशा Sextortion स्कॅममध्ये अडकायचं नसेल तर त्यासाठी काही टिप्स आहेत. त्याबद्दल जाणून घ्या.

Sextortion म्हणजे नेमकं काय?

Sextortion मध्ये आरोपी तुम्हाला व्हिडीओ कॉल करतात. यानंतर काही आक्षेपार्ह चाळे करत व्हिडीओ रेकॉर्ड केला जातो.

अशाप्रकारे जाळ्यात अडकवतात

या व्हिडीओत ते तुम्हाला अशाप्रकारे दाखवतात, जणू काही तुम्हीच पीडित आहात असं वाटू शकतं. यानंतर तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं. नंतर सोशल मीडियावर शेअर करण्याची भीती दाखवत घाबरवलं जातं.

लाखो रुपयांचा चुना

यानंतर स्कॅमर्स भोळ्या भाबड्या लोकांकडून लाखो रुपये लुटतात. ऑक्टोबर महिन्यात Sextortion चं असंच एक प्रकरण समोर आलं होतं. यामध्ये रेल्वे कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती.

WhatsApp मध्ये खास फिचर

Sextortion च्या जाळ्यात न अडकण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअपच्या एका खास फिचरची मदत घेऊ शकता. WhatsApp मध्ये नको असणारे कॉल रोखण्यासाठी एक फिचर आहे.

अज्ञात कॉल्स म्यूट होतील

सेटिंगमध्ये बदल केल्यानंतर अज्ञात क्रमांकावरुन आलेल्या कॉलची रिंग वाजणार नाही. पण WhatsApp च्या मिस्ड कॉलमध्ये तुम्हाला हा नंबर दिसेल.

हे फिचर ऑन कसं करायचं?

WhatsApp मध्ये Silence Unknown Callers फिचर आहे, जे Enable करावं लागेल. यासाठी WhatsApp च्या सेटिंगमध्ये जा, तिथे प्रायव्हसीवर क्लिक करा आणि नंतर कॉल्समध्ये जाऊन Silence Unknown Callers ला Enable करा.

Silence Unknown Callers ला Enable केल्यानंतर अज्ञात क्रमांकावरुन येणारे सर्व कॉल्स म्यूट होतील. या माध्यमातून तुम्ही Sextortion पासून वाचू शकता.

VIEW ALL

Read Next Story